चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. जगातील इतर देशांमध्ये दररोज कोरोनाग्रस्तांचा आकडा हजारोने वाढत असताना, चीनमध्ये मात्र स्थिती नियंत्रणात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. चीनमध्ये एका दिवसात 61 नवे रुग्ण आढळले आहेत. ही एप्रिलनंतरची एका दिवसातील सर्वाधिक संख्या आहे. चीनच्या तीन प्रांतांमध्ये नवे रुग्ण आढळले आहेत.
चीनमध्ये पुन्हा वाढली कोरोनाग्रस्तांची संख्या, एप्रिलनंतर एका दिवसात आढळले सर्वाधिक रुग्ण
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेनुसार, येथील उत्तर पश्चिम शिनजियांग प्रांतात 57 नवीन रुग्ण आढळले आहेत. येथे मध्य जुलैमध्ये अचानक व्हायरसची लाट आली होती. उत्तर पुर्व लायनिंगमध्ये देखील नवीन 14 रुग्ण आढळले आहेत. डालियान शहरात मागील आठवड्यात व्हायरसचे क्लस्टर समोर आले आहे. उत्तर कोरियाला लागून असलेल्या जिलिन प्रांतात दोन रुग्ण आढळले आहेत. मे नंतर पहिल्यांदाच येथे रुग्ण आढळले आहेत.
14 एप्रिलनंतर पहिल्यांदाच येथे एवढे रुग्ण आढळले आहेत. 14 एप्रिलला चीनमध्ये 89 रुग्ण आढळले होते. चीन डालियानमध्ये एक सोबत हजारो लोकांचे टेस्टिंग करत आहे. शिनजियांग प्रांतातील उरुमकी येथे देखील मास टेस्टिंग करण्यात आले. येथील 30.5 लाख लोकसंख्येपैकी जवळपास 20 लाख लोकांचे टेस्टिंग झाले आहे.
चीनमध्ये सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या 331 आहे. यातील 21 जणांची प्रकृती गंभीर आहे.