नवी दिल्ली – राजस्थानत मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचीन पायलट यांच्यात वर्चस्वाच्या लढाईला सुरुवात झाल्यानंतर भाजपचे कमळ पायलट हातात घेणार याची जोरदार चर्चा देशासह राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. पण, तेव्हा या चर्चांना निरर्थक असल्याचे म्हणत पायलट गटाने तत्काळ पूर्णविराम दिला होता. पण त्यांची याच दरम्यान गेहलोत यांच्याविरोधातील नाराजी प्रकर्षाने दिसून येत राहिली. असे असतानाच काँग्रेसला आता काही प्रमाणात शूभ संकेत मिळाल्याचे चित्र सध्या दिसत आहेत.
सचिन पायलट यांच्या फेसबुक पोस्टवर पुन्हा ‘हात’ अवतरला
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर सचिन पायलट यांनी काही पोस्ट्स केल्या आहेत. यात काँग्रेस पक्षाचे चिन्ह पुन्हा परतल्याचे दिसत आहे. एका मागोमाग एक अशा अनेक पोस्ट त्यांनी केल्या आहेत. राजस्थान त्यांचा वाद सुरू झाल्यानंतर पक्षाचे चिन्ह त्यांच्या फेसबुक पोस्ट्सवरून गायब झाले होते. यानंतर ते भाजपमध्ये जाण्याच्या अथवा दुसरा एखादा पर्याय निवडण्याची चर्चा सुरू झाली होती.
फेसबुकवरून केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त माजी उप-मुख्यमंत्री पायलट यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यात हाताचे चिन्ह दिसत आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे, की ‘सेवा आणि निष्ठेचा पर्याय आणि राष्ट्राची सुरक्षितता आणि जनतेच्या रक्षणासाठी सदैव निःस्वार्थ भावाने समर्पित असलेल्या केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या सर्व जवानांना तसेच देशावासीयांना केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
त्याचबरोबर माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्तानेही त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली आहे, या दोन्ही पोस्टच्या खालच्या बाजूला काँग्रेस पक्षाचे चिन्ह दिसत आहे. तर दुसरीकडे, सचिन पायलट यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससंदर्भात माहिती देण्यात आली आहे. तत्पूर्वी सचिन पायलट यांनी कारगील विजय दिवस आणि नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर एक पोस्ट शेअर केल्या होत्या, पण या पोस्टमधून काँग्रेसचा हात गायब झाला होता. यानंतरच ते भाजपा अथवा एकादा दुसरा पर्याय निवडण्याची शक्यता असल्याची चर्चा केली जात होती.