11 वी ऑनलाईन प्रवेशासाठी आजपासून मिळणार लॉग इन आयडी पासवर्ड


मुंबई : पुन्हा एकदा 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर झाले असून विद्यार्थ्यांना आजपासून लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळणार आहेत. तर विद्यार्थ्यांना 1 ऑगस्टपासून 11 वी ऑनलाईन प्रवेश अर्जाचा भाग 1 भरता येणार आहे. 11 वीची प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राज्यातील मुंबई महानगर, पुणे नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या विभागात होणार आहे. पण विद्यार्थी आणि पालकांना सदर प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप पुरेशी जागृती झालेली नसल्याने या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग 1 भरण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार उद्यापासून अर्जाचा भाग 1 भरायचा होता, पण हा अर्ज 1 आता ऑगस्टपासून विद्यार्थी भरणार आहेत.

कनिष्ठ महाविद्यालय, मार्गदर्शक केंद्र तसेच माध्यमिक शाळांचे या ऑनलाईन प्रवेशाबाबत प्रशिक्षण वर्ग घेण्यात येत आहेत. पण याबाबत अद्याप विद्यार्थी आणि पालकांना सविस्तर माहिती देण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशा सूचना विभागीय उपसंचांलकना शिक्षण संचालकांकडून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी आणि पालकांना सखोल ऑनलाइन प्रवेशाबाबतची माहिती दिलेल्या अधिकृत ठिकाणी मिळावी यासाठी दक्षता घ्यावी असे संचालकांकडून सांगण्यात आले आहे.

नव्याने जाहिर झालेल्या वेळापत्रकानुसार आजपासून 11 वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे. लॉग इन आयडी मिळवून पासवर्ड तयार केले जातील. तर 1 ऑगस्ट पासून दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन मिळालेल्या लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करून 11 वी प्रवेशसाठीचा अर्ज भाग – 1 भरणे, शुल्क भरून फॉर्म लॉक केला जाऊ शकतो. अर्जातील माहिती शाळा, मार्गदर्शन केंद्रवरून प्रमाणित करून घेणे, त्याचबरोबर विद्यार्थी प्रवेश अर्जातील माहिती तपासून/ verify करून अर्ज पूर्णपणे भरणे, तसेच 10 वी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाग- 2 महाविद्यालय पसंती क्रमांक भरावा.