ग्लेनमार्कचा दावा; फेव्हिपिराविर औषधाने लवकर बरे होतात कोरोना रुग्ण

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसवर औषध शोधण्याचे काम सुरू आहे. अनेक कंपन्या आपले औषध या आजारावर प्रभावी ठरत असल्याचा दावा करत आहेत. आता ग्लेनमार्कने फेव्हिपिराविर औषध हलके व मध्यम लक्षण असणाऱ्या कोरोना रुग्णांना बरे करते असा दावा केला आहे. ही माहिती फार्मा कंपनीने आपल्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलचे परिणाम जाहीर करताना दिली.

कंपनीने म्हटले की, तिसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये एकूण लोकसंख्येच्या 28.6 टक्के वेगाने बरे होण्याचा दर आहे. अन्य रुग्णांच्या तुलनेत फेव्हिपिराविरने रुग्ण लवकर बरे झाले आहेत. या औषधाने कोव्हिड-19 चे 40 टक्के रुग्ण वेगाने रिकव्हर झाले. त्यांचे तापमान, ऑक्सिजन सॅच्यूरेशन, श्वसन दर आणि खोकला क्लिनिकल ट्रायलमध्ये सरासरी वेळेत कमी झाले.

फेव्हिपिराविर एक अँटीव्हायरल औषध आहे. या औषधाचे भारतातील 7 क्लिनिकल साइट्सवर 150 हलके व मध्यम कोरोनाग्रस्तांवर याचे ट्रायल करण्यात आले.

ग्लेनमार्कच्या क्लिनिकल डेव्हलपमेंटच्या प्रमुख आणि उपाध्यक्ष मोनिका टंडन म्हणाल्या की, या परिणामांनी आम्हाला उत्तेजन दिले आहे. यातून संकेत मिळतो की फेव्हिपिराविरच्या सुरूवाती उपचाराने हलके व मध्यम रुग्यांच्या क्लिनिकल परिणामांमध्ये सुधारणा होऊ शकते. हे रुग्णांचे तीव्र श्वसन सिंड्रोम आणि मृत्यू दर कमी करू शकते.