आक्षेपार्ह आडनावामुळे वारंवार फेटाळला गेला महिलेच्या नोकरीचा अर्ज


कोणत्याही व्यक्तिची ओळख ही त्याच्या आडनावामुळे होते. पण आडनावामुळे अडचण निर्माण झाल्याचे कधी तुमच्या ऐकण्यात आले आहे का? होय, पण आडनावामुळे आसाममधील एका महिलेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारण तिच्या आक्षेपार्ह आडनावामुळे तिला कुठेही नोकरी मिळत नाही. त्याचबरोबर तिचे अर्जावरील आडनाव बघितल्यानंतर तिचा अर्ज नाकारला जातो.

सरकारी कंपनी नेशल सीड कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये गुवाहाटीची रहिवासी असलेली प्रियंका यांनी नोकरीसाठी अर्ज करण्याचा प्रयत्न करत होती. पण तिचे आडनाव Chutia असे असल्यामुळे तिचा अर्जच वेबसाइट आणि सॉफ्टवेअर रिजेक्ट करत होते. पण तरी प्रियंका पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिली. प्रत्येक वेळी तिच्या पदरी निराशाच पडली. कारण सॉफ्टवेअर तिचे आडनाव रिजेक्ट करत तिला स्लॅगचा वापर न करण्यासाठी सांगत होते. तिने हा सगळा प्रकार फेसबुकवर सांगितला आहे. त्याचबरोबर लिहिले की, आडनावामुळे ती जिथेही इंटरव्ह्यूला जाते लोक तिचे नाव ऐकून हसतात.

फेसबुकवर प्रियंकाने लिहिले की, तिचा नोकरीसाठीचा अर्ज एका सरकारी कंपनीत पुन्हा पुन्हा यासाठी रिजेक्ट केला गेला. कारण तिचे जे आडनाव आहे ते वेबसाइट रिजेक्ट करत होती. तिने लिहिले की, मला दु:ख वाटत आहे आणि लोकांना सांगून थकले की, आपल्या आडनावात कोणताही अपशब्द नाही. ज्या समुदायातून ती आली त्या समुदायाचे ते शीर्षक आहे. प्रियंकाने तिच्या समुदायातील लोकांना फालतूचा वाद सोडून या मुद्दयावर काम करण्याची विनंती केली.

दरम्यान प्रियंकाने खासगी स्तरावर तक्रार केल्यानंतर तिचा नोकरीचा अर्ज कंपनीने स्वीकारला आहे. आसाममध्ये एक आदिवासी जमात आहे ज्यांचे नाव Chutia आणि Sutiya असते. आसाममध्ये राहणारा हा आदिवासी समुदाय मूळचा मंगोलियाच्या चीन-तिबेट परिवाराचे वंशज मानले जातात.