मुंबई महानगरपालिकेची 203 विविध पदांसाठी भरती; ३० हजार रुपये ठोक मानधन


मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मायानगरी मुंबईला कोरोना नावाच्या महामारीची नजर लागली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत आहे. मुंबईतील कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष कोव्हिड उपचार केंद्रे तसेच विविध रुग्णालये येथे पॅरामेडिकल संवर्गातील कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात 3 महिन्यांच्या कालावधीसाठी ठोक मानधन तत्त्वावर भरती करण्यात येणार आहे. ही भरती एकूण 203 विविध पदांसाठी असून 24 जुलैपर्यंत यासाठी अर्ज करता येतील. या पदांसाठी कसा अर्ज कराल आणि या पदासंदर्भातील माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.

  • एकूण रिक्त पदे 203 :-
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 51 पदे. पात्रता – बी.एस्सी. + डीएम्एल्टी उत्तीर्ण किंवा 12 वी + पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी मेडिसिनमधील पदवी उत्तीर्ण.
  • क्ष-किरण तंत्रज्ञ – 52 पदे. पात्रता – 12 वी + पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफीमधील पदवी उत्तीर्ण किंवा बी.एस्सी. + रेडिओग्राफी पदविका उत्तीर्ण आणि 1 वर्षाचा अनुभव किंवा 12 वी (विज्ञान/टउश्उ) + रेडिओग्राफी पदविका उत्तीर्ण आणि 2 वर्षांचा अनुभव.
  • ई.सी.जी. तंत्रज्ञ – 39 पदे. पात्रता – 12 वी + पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी टेक्नॉलॉजीमधील 3 1/2 वर्षांचा पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण.
  • औषध निर्माता – 61 पदे. पात्रता – डी.फार्म./बी.फार्म. (उमेदवार महाराष्ट्र राज्य फार्मसी काऊन्सिलकडे नोंदणीकृत असावा.)

वयोमर्यादा – दि. 1 जुलै 2020 रोजी 18 ते 50 वर्षे.

वेतन – सर्व पदांकरिता ठोक मानधन रु. 30,000/- प्रतिमाह.

निवड पद्धती – अंतिम वर्षाच्या पदवी/पदविका परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या टक्केवारीनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. (पदविका/पदवी परीक्षा एकापेक्षा जास्त प्रयत्नांत उत्तीर्ण केली असल्यास अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षेत उमेदवारांनी प्राप्त केलेल्या एकूण गुणांमधून प्रत्येक प्रयत्नासाठी 10 गुण वजा केले जातील.)

या संकेतस्थळावरील जाहिरातीसोबत अर्जाचा विहीत नमुना या लिंकवर उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे व्यक्तीशः अर्ज प्रवैअ व खाप्र (माआसे) यांचे कार्यालय, सातवा मजला, के.बी. भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय, डॉ. आर्.के. पारकर मार्ग, बांद्रा (प.), मुंबई – 400 050 या ठिकाणी सादर केला जाऊ शकतो. त्याचबरोबर उमेदवारांनी आपले अर्ज व्यक्तीशः अथवा ई-मेलद्वारे कागदपत्रांच्या/गुणपत्रिकांच्या/प्रमाणपत्रांच्या स्कॅन कॉपीसह दि. 24 जुलै 2020 संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत [email protected] या ई-मेल आयडीवर अपलोड करावेत.