कोरोना : मेलानिया ट्रम्प यांनी स्विकारली व्हाईट हाऊसच्या किचनची जबाबदारी, गरजूंपर्यंत पोहचवले जेवण

कोरोना व्हायरस महामारीने जगभरात थैमान घातले आहे. याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. आता व्हाईट हाऊसने वॉशिंग्टन डीसीमधील गरजूंना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. विशेष म्हणजे या नागरिकांच्या जेवणाची जबाबदारी अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांच्याकडे आहे. या संकटाच्या काळात पहिल्यांदाच मेलानिया ट्रम्प यांनी सार्वजनिक ठिकाणी स्वतः लोकांपर्यंत जेवण पोहचवले.

आपले युवा कल्याण अभियान बी बेस्टच्या प्रचारासाठी मेलानिया ट्रम्प अनेकदा शाळा, हॉस्पिटल आणि इतर ठिकाणी जात असे. मात्र आता शाळा बंद असल्याने मेलानिया ट्रम्प यांनी प्रेरणा देण्यासाठी व्हाईट हाऊसच्या किचनची जबाबदारी स्विकारली आहे. मागील आठवड्यात मेलानिया यांनी कोलंबियाच्या अग्निशामक आणि इमर्जेंसी मेडिकल सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली होती. यावेळी त्या आपल्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये तयार केलेले जेवण, मोठ्या बॅग्स, फेस मास्क आणि हँड सॅनिटायझर घेऊन गेल्या होत्या. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची देखील भेट घेतली.

मेलानिया ट्रम्प म्हणाल्या की, मी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती अग्निशामक, पोलीस कर्मचारी, ईएमएस कर्मचारी आणि इतर लोक ज्यांनी दुसऱ्या देशांपासून रक्षण करण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला, त्यांच्यासोबत उभे आहोत.

मेलानिया ट्रम्प यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क लावण्याचे लोकांना आवाहन केले आहे. सोबतच व्हाईट हाऊसच्या कर्मचाऱ्यांना 150 जेवणाचे डब्बे पाठविण्यास देखील सांगितले. नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ येथे हे जेवण पाठविण्यात आले.