पुतिन यांच्यासह रशियातील धनाढ्यांना एप्रिलमध्येच देण्यात आली होती कोरोना प्रतिबंधक लस!


मॉस्को : जगभरातील बहुतांश देशांवर कोरोना महामारीचे संकट ओढावले असून हे संकट दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याचबरोबर या महामारीमुळे लाखो लोकांनी आपला जीव गमावला आहे. पण कोरोना समोर जगभरातील शास्त्रज्ञांनी शरणागती पत्करलेली नाही. या महामारीचा समूळ नाश करणारे औषध शोधण्याचा प्रयत्न या शास्त्रज्ञांकडून होत आहे. या शास्त्रज्ञांकडून जगभरातील लोकांच्या अनेक अपेक्षा आहेत. अशातच रशियाबाबत एक धक्कादायक महिती समोर आली आहे.

कोरोना व्हायरसची लस तयार करत असलेल्या संशोधकांच्या शेकडो टीममधील काही टीम एक पाऊल पुढे जात आहे. रशियाच्या संशोधकांचा यामध्ये समावेश आहे. रशियाने दावा केला आहे की त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीची मानवी चाचणी पूर्ण केली आहे. आताच एका रिपोर्टमधील खुलाशानुसार रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्यासह देशातील अनेक धनाढ्य व्यक्तींनी एप्रिल महिन्यातच कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली आहे. यासंदर्भात ब्लूमबर्गने दिलेल्या अहवालानुसार रशियातील अरबपती आणि राजकीय नेत्यांना कोरोना प्रतिबंधक लस एप्रिलमध्ये देण्यात आली आहे.

त्याचबरोबर पुतीन यांना देखील ही लस देण्यात आली आहे की नाही हे सांगू शकत नाही. ही लस अल्यूमिनियमची मोठी कंपनी युनायटेड रसेलचे प्रमुख अधिकारी, अरबपती आणि सरकारी अधिकाऱ्यांना लस देण्यात आली आहे. मॉस्को येथील रशियाची सरकारी कंपनी गमलेया इन्स्टिट्यूटने ही लस एप्रिलमध्ये तयार केली होती. या खुलाशानंतर आता मोठी चर्चा सुरु झाली आहे. जर खरोखरच रशियाने कोरोना प्रतिबंधक लसीची ह्युमन ट्रायल पूर्ण केली असेल तर त्याबाबतची माहिती जगाला का देण्यात आली नाही.