मन सुन्न करणारी घटना; कोरोनाशी लढणाऱ्या आईला पाहण्यासाठी ‘तो’ चढायचा रुग्णालयाच्या इमारतीवर

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दररोज अनेक मन हेलावून टाकणाऱ्या घटना समोर येत आहे. अशाच एका मुलाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटो मागची माहिती वाचल्यानंतर तुमचे देखील डोळे पाणावतील.

व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये वेस्ट बँक येथील बेइट आवा शहरातील एक पॅलेस्टाईन मुलगा जिहाद अल-सुवाती हेब्रोन हॉस्पिटलमध्ये आयसीयूच्या खिडकीवर चढून आपल्या आईला अखेरचे पाहत आहे. खिडकीवर बसलेल्या या मुलाच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ट्विटर यूजर @mhdksafa ने हा फोटो शेअर केला आहे. त्याने लिहिले की, कोव्हिड-19 चा संसर्ग झालेली एक पॅलेस्टाईन महिला हॉस्पिटलमध्ये भरती होती. आईला बघण्यासाठी मुलगा तिच्या मृत्यूपर्यंत दररोज हॉस्पिटलच्या खोलीतील खिडकीवरून चढून पाहत असे.

Pour accompagner sa mère atteinte du COVID-19, Jihad Al-Suwaiti grimpait le mur de l’hôpital de Hébron en Cisjordanie…

Posted by AJ+ français on Sunday, July 19, 2020

जिहादची आई 73 वर्षीय रस्मी सुवाती यांना कोरोनाची लागण झाल्याने हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अशा स्थितीमध्ये आईला पाहण्यासाठी त्याच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. त्यामुळे तो दररोज हॉस्पिटलच्या इमारतीवर चढून आईला पाहत असे. 5 दिवस उपचारानंतर अखेर जिहादच्या आईचा मृत्यू झाला. तो म्हणाला की, तिच्या अखेरच्या क्षणात मी असाहय्य होऊन आयसीयूच्या खिडकीबाहेर बसून केवळ पाहत असे.