कोरोना : वॉल्व असलेले एन-95 मास्क धोकादायक, सरकारने केले सावध

जर तुम्ही देखील कोरोनापासून वाचण्यासाठी एन-95 मास्कचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारने मास्कबाबत एक एडवाइजरी जारी केली आहे. यामध्ये एन-95 मास्कला कोरोनासाठी धोकादायक म्हटले आहे. सरकारच्या आरोग्य सेवेचे महासंचालक डॉ. राजीव गर्ग यांनी राज्यांना पत्र लिहित याच्या वापरावर बंदी घालण्यास सांगितले आहे. सरकारकडून सांगण्यात आले आहे की वॉल्व असलेले एन-95 मास्क कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुर्णपणे अयशस्वी आहेत.

केंद्राने पत्र लिहित म्हटले आहे की, वॉल्व असलेल्या एन-95 मास्कमुळे व्हायरसचा प्रसार थांबत नाही. हे कोव्हिड-19 महामारी रोखण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांच्या अगदी विरोधात आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या ऐवजी लोक एन-95 मास्कचा चुकीचा वापर करत आहेत. खासकून ज्यात वॉल्व लावलेले आहे.

राजीव गर्ग पत्रात म्हणाले की, वॉल्व असलेला एन-95 मास्क व्हायरस मास्कच्या बाहेर येण्यापासून रोखत नाही. त्यामुळे लोकांना सुचणा देण्यात याव्यात की फेस/माउथ कव्हरचा वापर करावा व एन-95 मास्कचा वापर करू नये.

सरकारच्या एडवाइजरीनुसार, कोरोनापासून वाचण्यासाठी ट्रिपल लेअर मास्कचा वापर सर्वाधिक सुरक्षित आहे. जागतिक आरोग्य संघटनेने वॉल्व असलेल्या मास्कच्या ऐवजी ट्रिपल लेअर असलेले मास्क सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.