कोरोना प्रतिबंधक लसीचा फॉर्म्युला शेअर करण्याची रशियाकडून ऑफर


नवी दिल्ली : रशियाच्या गेमालेया इंस्टीट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने कोरोना प्रतिबंधक लस तयार केल्याचा दावा केल्यानंतर रशियावर अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडा या देशांनी कोरोना लसीचा आपला फॉर्म्युला चोरल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता रशियाने तोच फॉर्म्युला शेअर करण्याची ऑफर केली आहे. गुरुवारी यूके नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटरने सांगितले होते की ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडामधील लॅबमधून रशियन हॅकर्स कोरोना लसीचा फॉर्म्युला चोरण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचे आरोप रशियाकडून फेटाळण्यात आले.

दरम्यान गेमालेयाचे प्रमुख अलेक्झांडर जिन्सबर्ग म्हणाले, रशियन तंत्रज्ञान दुर्मिळ असून त्याचे पेटंट केले गेले आहे. मी दाव्यासह सांगू इच्छितो की हे पाश्चिमात्य देशांपेक्षा अधिक प्रभावी आहे. आमच्या लसीकरण योजनेचे संपूर्ण जग कौतुक करेल, आमच्याकडून उधार घेईल.

त्याचबरोबर लस संबंधित डेटा वेस्टमधील सहकाऱ्यांबरोबर शेअर करण्यासाठी आपण तयार आहोत. हे तेच तंत्रज्ञान आहे जे 25 वर्षांपासून बर्‍याच कोरोनासारख्या विषाणूंसाठी रशिया विकसित करीत आहे. यापूर्वीच गेमालेया लसीची क्लिनिकल चाचणी रशियाच्या दोन संस्थांमध्ये सुरू आहे. आपल्या देखरेखीच्या सूचीवर जागतिक आरोग्य संघटनेने गेमालेया व्यतिरिक्त जगातील 22 इतर संस्था ठेवल्या आहेत, ज्याला क्लिनिकल चाचण्यांचे तीनही टप्पे पूर्ण केल्यानंतर मोठ्या प्रमाणात उत्पादनाची परवानगी दिली जाऊ शकते.