काँग्रेस नेत्याचा देशी ईलाज; कोरोनाला दूर ठेवण्यासाठी रम प्या आणि फ्राय अंडे खा

बंगळुरु – कोरोना या जीवघेण्या महामारीच्या विरोधातील लढ्यात संपूर्ण जग एकवटलेले आहे. त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधक लस शोधण्यासाठी जगभरातील संशोधक आणि वैज्ञानिक अहोरात्र मेहनत घेत आहे. पण त्याला काही प्रमाणात यश आले असले तरी अद्याप कोणत्याही देशाकडून याची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली नाही.

दरम्यान वैज्ञानिकाकडून या वर्षीच्या अखेरपर्यंत कोरोना विषाणूवर लस मिळण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच जगभरातील अनेकजण अशा सकंटकाळात कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी कोणता उपाय कधी शोधेल याचा काही नेम नाही.

अशातच आपल्या देशातील एका नेत्याने केलेल्या या वक्तव्यावर तुम्ही विचार कराल किंवा हसाल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काँग्रेसच्या एका नेत्याने असाच एक देशी उपाय शोधला असून त्यामुळे कोरोना बरा देखील होतो असा दावाही केला आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर मंगळुरुमधील उल्लाल शहरातील काँग्रेस नेता रविचंद्र गट्टी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. गट्टी यांनी या व्हिडीओत कोरोनावरील देशी उपचार सांगितला असून ते या व्हिडीओत म्हणतात की, रम आणि दोन तळलेल्या अंड्याचे सेवन केल्याने कोरोनावर सहज मात करता येईल.

रविचंद्र गट्टी व्हायरल व्हिडीओमध्ये कोरोना दूर ठेवण्यासाठीचे औषध सांगताना दिसत आहेत. ते म्हणतात की, ९० मिली रममध्ये एक चमचा काळी मिर्ची टाका. त्यानंतर त्याचे मिश्रण चांगल्या पद्धतीन करा आणि प्या. त्यासोबत दोन अंड्यांचा ऑमलेट किंवा दोन फ्राय अंडी खा. गट्टी यांनी कोरोनासोबत लढण्यासाठी हा देशी फॉर्मुला सांगितला आहे. त्यांनी त्याचे स्वतः देखील सेवन केले आहे.

आपल्या या दाव्यापाठीमागील तर्कही रविचंद्र गट्टी सांगत आहेत. गट्टी यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी चांगलीच खिल्ली उडवली आहे. एक यूजर्सने लिहिले आहे की, कोरोना मरेल किंवा नाही, पण अंडे खाल्ले म्हणून आई नक्की मारेल. अन्य दुसरा एक युझर्सने अरे हिऱ्या एवढ्या दिवसांपासून तू कुठे लपला होतास, असे म्हटले आहे.