ऑनलाईन शिक्षणाबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून मार्गदर्शकतत्वे जारी


मुंबई : देशभरात ऑनलाईन शिक्षण कशाप्रकारे दिले जावे यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून ‘प्रज्ञाता’ विशेष मार्गदर्शकतत्वे जारी करण्यात आले आहेत. या मार्गदर्शकतत्वांमध्ये ऑनलाईन शिक्षण देताना स्क्रीन टाईमबाबत मार्गदर्शन करताना पूर्व प्राथमिक (प्री प्रायमरी) शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेसद्वारे शिक्षण हे 30 मिनिटांपेक्षा जास्त घेण्यात येऊ नये, असे सांगण्यात आले आहे. तर इयत्ता पहिली ते आठवीसाठी 30 ते 40 मिनिटांचे दोन ऑनलाईन सेशनमध्ये क्लास घेऊन शिकवावे. तर इयत्ता नववी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी हे 30 ते 40 मिनिटांचे चार ऑनलाईन सेशन क्लास घेऊन शिक्षण देण्यात यावे, अशा सचूना या मार्गदर्शकतत्वांमध्ये देण्यात आल्या आहेत.


केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विट करून शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक यांना डिजिटल शिक्षणसंबंधी मार्गदर्शन म्हणून ही मार्गदर्शकतत्वे जाहीर करून स्क्रीन टाईमसोबत डिजिटल माध्यमातून शिक्षण घेत असताना मानसिक-शारीरिक स्ट्रेसला कसा दूर करता येईल, याबाबत यामध्ये माहिती दिली आहे.

‘प्रज्ञाता’ मार्गदर्शकतत्वांमध्ये प्रामुख्याने आठ मुख्य स्टेप्सनुसार ऑनलाईन शिक्षण शिकवतानाच्या मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत.

  • प्लान (नियोजन)
  • रिव्हीजन ( उजळणी करणे)
  • अरेंज ( योजने)
  • गाईड ( मार्गदर्शन करणे)
  • yak(talk) (बोलणे)
  • असाईन ( अभ्यास करायला सांगणे)
  • track ( एक विशेष पद्धतीने अभ्यासक्रम पुढे घेऊन जाणे)
  • appreciate (दाद देणे)

या महत्वाच्या स्टेप्सवर विशेष सूचना करून त्या कशा स्वरूपात अंमलात आणायच्या याबाबत सांगितले गेले आहे.

पूर्वीसारखे शाळेत दिले जाणाऱ्या शिक्षणाबाबत कोरोना महामारीच्या काळात विचार करत न बसण्यापेक्षा सद्यःस्थितीत घरी राहून विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून कसा दर्जेदार शिक्षण आपल्याला देता येईल यासाठी विविध पर्यायांचा अवलंब करून त्याचा मिश्रण करणे या काळात गरजेचे असल्यामुळे या मार्गदर्शकतत्वे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून त्याचा विचार करून एक ऑनलाईन, डिजिटल माध्यमातून शिक्षण देताना एक रोडमॅप किंवा काही मुद्दे दिले जावे आणि ऑनलाईन शिक्षण अधिक दर्जेदार व्हावे यासाठी या मार्गदर्शकतत्वे देण्यात येत असल्याचे पोखरियाल यांनी सांगितले आहे.

Leave a Comment