फोटो गॅलरी; वोग मॅगजीनच्या कव्हर पेजवर अनुष्काचा हॉट आणि बोल्ड अंदाज


भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी व अभिनेत्री अभिनेत्री अनुष्का शर्माने वोग फॅशन मॅगजीनसाठी पुन्हा एकदा हॉट आणि बोल्ड फोटोशूट केले असून अनुष्काचा हा अंदाज तिच्या चाहत्यांच्या पसंतीस चांगलाच उतरत आहे. यामध्ये अनुष्का खूपच सुंदर आणि बोल्ड दिसत असल्यामुळे तिचा हा सेक्सी, हॉट आणि बिनदास्त लूक चाहत्यांना आवडत आहे.


अनुष्काने वोग मॅगजीनच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केले असून अनुष्का फोटोशूटमध्ये कधी बिकिनीमध्ये, कधी क्रॉप टॉपसोबत, कधी स्क्रर्ट आणि तर कधी लॉन्ग शर्टमध्ये दिसत आहे.


ती या फोटोंमध्ये अत्यंत बोल्ड दिसत आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडत असतानाच विराटच्या कमेंटमुळे अनेकांचे लक्ष त्याच्याकडे वेधले आहे.


अनुष्काचे हॉट आणि बोल्ड फोटो पाहिल्यानंतर त्याच्यावर कमेंट करण्याचा मोह विराटलादेखील आवरता आला नाही. विेशेष म्हणजे अनुष्काने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोवर त्याने कमेंट केली आहे.


दरम्यान, सध्या या फोटोंमुळे जरी अनुष्का चर्चेत येत असली, तरीदेखील ती काही दिवसांपूर्वी तिच्या ‘बुलबुल’ आणि ‘पाताल लोक’ या वेबसिरीजमुळे चर्चेत आली होती. या सिरीजच्या माध्यमातून तिने वेबविश्वात पदार्पण केले आहे. या दोन्ही सिरीजची निर्मिती अनुष्काच्या प्रोडक्शन हाऊसअंतर्गत करण्यात आली. या दोन्ही वेब सिरीजला नेटकऱ्यांची चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Leave a Comment