शिक्षणमंत्र्यांनी सांगितली दहावी-बारावीच्या निकालाची तारीख


मुंबई : कोरोनाचा फटका देशासह राज्यातील जवळपास सर्वच घटकांना बसला असून याला दहावी आणि बारावीचे विद्यार्थीही अपवाद नाहीत. दहावी-बारावीचे पेपर तपासण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विलंब झाल्यामुळे निकालही लांबवणीवर पडला. यातच निकालाच्या तारखेसंदर्भात सोशल मीडियावर दावा करण्यात होता. पण आता दहावी आणि बारावीच्या निकालासंदर्भात राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकडवाड यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

15 ते 20 जुलै यादरम्यान राज्यात बारावीचा निकाल जाहीर होईल, तर 31 जुलैपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिल्यामुळे आता विद्यार्थ्यांसह पालकांची धाकधूक वाढली आहे.

दरम्यान, या वर्षी इयत्ता बारावीच्या 13 लाखाहून अधिक तर दहावीच्या 17 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. बारावीचे निकाल 15 जुलै तर दहावीचे निकाल जुलै अखेरपर्यंत जाहीर केले जातील अशी माहिती मिळत आहे. दुसरीकडे, 11 वीच्या प्रेवशाची ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ऑनलाइन नोंदणी 15 जुलैपर्यंत करता येणार असून निकाल लागल्यानंतर महाविद्यालय निवड प्रक्रिया करता येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Comment