संजय राऊत यांनी शेअर केला एक शरद, सगळे गारद…! मुलाखतीचा प्रोमो


मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या कामाची जी पद्धत आहे, ती शिवसेनेची पद्धत असल्याचे म्हणत सत्ता भाजपच्या हातात देणे शिवसेनेच्या हिताचे नसल्याचे वक्तव्य केले आहे. शनिवारी ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या मुलाखतीचे प्रोमो शेअर करत आहेत. शुक्रवारी संजय राऊत यांनी अजून एक प्रोमो शेअर केला असून यावेळी त्यांनी पोस्टमध्ये सत्ता ही विनयाने वापरायची असते, शरद पवार यांची जोरदार मुलाखत असे लिहिले आहे.

शरद पवारांनी या प्रोमोमध्ये काही महत्त्वाची वक्तव्य केली आहेत. उद्धव ठाकरेंच्या कामाची जी पद्धत शिवसेनेची पद्धत असून सत्ता भाजपच्या हातात देणे शिवसेनेच्या हिताचे नसल्याचे शरद पवार बोलत असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर सत्ताकेंद्र राज्यात एकच असले पाहिजे, असेही शरद पवारांनी म्हटेल आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्यामागे महत्त्वाची भूमिका राहिली आहे. महाविकास आघाडीचे शरद पवार हेच खरे शिल्पकार असल्याचे अनेकदा बोलले गेले आहे. त्याचबरोबर शरद पवार यांच्याकडे राज्य सरकारचा रिमोट कंट्रोल असून ते पडद्यामागून सरकार चालवत असल्याचेही अनेकदा विरोधकांनी म्हटले आहे. हे दावे फेटाळून शरद पवार यांनी अनेकदा लावले आहेत. दरम्यान शरद पवारांची नेमकी भूमिका किंवा काय मत आहे याचा उलगडा पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीमधून होणार आहे.

संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली असून तीन भागात ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान त्याआधी संजय राऊत यांनी ट्विटरवर मुलाखतीचे टिझर शेअर केले आहेत. मुलाखतीचा पहिला भाग ११ जुलै रोजी शिवसेनेच्या मुखपत्रातून आणि डिजिटल माध्यमाद्वारे प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यानंतर १२ आणि १३ जुलै रोजी मुलाखतीचा दुसरा आणि तिसरा भाग प्रसिद्ध होणार आहे.

Leave a Comment