‘त्या’ तीन शब्दांमुळे ट्रोल झाल्या फडणवीसांच्या सौभाग्यवती


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्ष नेता तसेच माजी मुख्यमंत्री राज्यातील वेगवेगळ्या शहरांमधील कोरोना परिस्थितीचा आढवा घेण्यासाठी सध्या दौरे करत आहेत. फडणवीस हे मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. कोरोनासंदर्भातील यंत्रणा उभारण्यात सरकारला आलेल्या अपयशासंदर्भात केलेले भाष्य असो किंवा प्रत्यक्ष कोरोना केंद्रांना भेटी देणे असो सध्या फडणवीस हे सतत बातम्यांच्या मथळ्यात दिसत आहेत. पण आता कालपासून त्यांच्या पत्नी म्हणजेच अमृता फडणवीस या देखील त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोंमुळे अचानक चर्चेत आल्या आहेत. पण या फोटोंमुळे अमृता फडणवीस यांना ट्रोल होत आहेत.

सार्वजनिक आरोग्य या विषयावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अमृता यांनी उपस्थिती लावली होती. अमृता यांनी स्वत:च्या ट्विटर अकाउंटवरुन यामध्ये नागपूरमधील एका संस्थेने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये सहभागी झाल्याचे काही फोटो पोस्ट केले. अमृता या फोटोंमध्ये या कंप्युटर स्क्रीनसमोर बसून वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या दिसत आहेत.


पण त्यांच्या या चार फोटोंपैकी एका फोटोमध्ये उजव्या बाजूला कोपऱ्यात असलेल्या कागदावर दिसणाऱ्या तीन शब्दांमुळे त्यांना ट्रोल केले जात आहेत. त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोंमधील एका फोटोत ‘फोटो लेते रहो’ असे तीन शब्द कागदावर लिहिल्याचे दिसत आहे. हा फोटो क्रॉप करुन काही जणांनी कागदाच्या तेवढ्याच तुकड्याचा फोटो अमृता यांच्या या फोटोवर कमेंटमधून पोस्ट केला आहे.


तर काही जणांनी या फोटोवर कमेंट करताना पुढच्या वेळेस सुचना दिल्यानंतर कागद उलटा करुन ठेवा असा सल्ला अमृता यांना दिला आहे. तर काहींनी फोटोच्या स्पेलिंगवरुन अमृता यांना ट्रोल केले आहे. ४०० हून अधिक कमेंट्स या फोटोवर असून याच तीन शब्दांवरुन अनेकांनी प्रतिक्रिया दिल्याचे पहायला मिळत आहे.

Leave a Comment