ट्विटरवरील कंटेट वाचण्यासाठी मोजावे लागणार पैसे!

ट्विटर उत्पन्न वाढविण्यासाठी पेड प्रोडक्टवर काम करत आहे. रिपोर्टनुसार कंपनीने या प्लॅटफॉर्मला ग्रिफॉन (Gryphon) असे कोडनेम दिले आहे. ट्विटरने यासाठी जॉब लिस्टिंग केल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये 8 टक्क्यांनी वृद्धी झाली.

रिपोर्टनुसार, ग्रिफॉन पेड अथवा स्बस्क्रिप्शन बेस्ट प्लॅटफॉर्म असेल. येथे एक्सक्लूझिव्ह माहिती वाचण्यासाठी युजर्सला पैसे द्यावे लागतील. कंपनीने ग्रिफॉनसाठी न्यूयॉर्कमध्ये वरिष्ठ सॉफ्टवेअर इंजिनिअर पदासाठी अर्ज देखील मागवले. या प्रोजेक्टवर काम करणारी टीम पुर्णपणे नवीन असेल.

सध्या ट्विटर मोफत सेवा देत आहे. मात्र पेड स्बस्क्रिप्शन, ट्विटर जाहिरात आणि डेटा लायसेंसिंगसाठी उत्पन्न जनरेट करण्यासाठी कंपनी दुसरे स्त्रोत शोधू शकते. दरम्यान, ट्विटरने या आधी देखील पेड प्लॅटफॉर्मवर काम करण्यास सुरूवात केल्याची माहिती समोर आली होती. 2017 मध्ये कंपनीने ट्विटडेक अ‍ॅप प्रीमियाम ऑफरिंगचे युजर्सला एक सर्वेक्षण पाठवले होते.

Leave a Comment