उद्यापासून आयटी हब हिंजवडीमध्ये आठ दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन


पुणे – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून (गुरूवार) आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीसह परिसरात कडकडीत लॉकडाउन पाळण्यात यावा, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात आले आहे. या लॉकडाऊनची हिंजवडीसह मान, मारुंजी, जांबे, नेरे, या ठिकाणी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दरम्यान, यामधून अत्यावश्यक सेवा आणि आयटी कंपन्यांना वगळण्यात आल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले आहे.

उद्यापासून १६ जुलै पर्यंत हिंजवडी परिसरात कडकडीत लॉकडाउन पाळला जाणार आहे. दरम्यान, यामधून अत्यावश्यक सेवा, आयटी कंपनी तसेच बांधकाम सुरू असलेल्या साईट्सना वगळण्यात आल्याची माहिती हिंजवडीच्या सरपंच आरती वाघमारे आणि मारुंजीच्या सरपंच पूनम बुचडे यांनी दिली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता पहाटे ६ ते ९ यावेळेत दूध पुरवठा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, ही कडक पावले उलचण्यात आल्याचे सरपंचांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, हिंजवडी परिसरात विनामास्क नागरिक आढळल्यास त्या व्यक्तिकडून ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे.

Leave a Comment