मोजून-मापून जेवण करतो विराट कोहली; अनुष्काने शेअर केला व्हिडीओ


कोरोनामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे सध्या आंतरराष्ट्रीयसह देशांतर्गत क्रिकेटचे सामने बंद आहेत. दरम्यान आजपासून इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी क्रिकेट मालिकेला सुरुवात होत आहे. पण भारतीय संघाचे सर्व दौरे ऑगस्ट महिन्यांपर्यंत स्थगित करण्यात आल्यामुळे भारतीय संघाचे सर्वच खेळाडू घरात आहेत. पण हे खेळाडू आता अक्षरशः कंटाळले आहेत. त्यामुळे काही खेळाडू लाइव्ह चॅटचा आधार घेत आहेत, तर काहीजण जुन्या आठवणींमध्ये रमताना दिसत आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हादेखील पत्नी अनुष्का शर्मासोबत निवांत वेळ घालवत आहे. पण त्याचसोबत तो त्याच्या तब्येतीची काळजी घेतानाही दिसत आहे.


एक ‘हॉट अँड फिट’ कपल म्हणून विराट आणि अनुष्का हे ओळखले जाते. त्यातच विराट हा आपल्या फिटनेस घेत असलेल्या मेहनतीमुळे त्याच्या फिटनेसचा मोठा चाहतावर्ग आहे. सततचे क्रिकेट सामने आणि जिममधील वर्कआऊट असा दिनक्रम असलेल्या विराटसाठी तंदुरूस्त राहणे हेच महत्त्वाचे असते. हे त्याने अनेकदा मुलाखतीत देखील सांगितले आहे.

पण सध्या क्रिकेटचे सामने होत नसल्यामुळे तसेच बाहेर पडण्यावरही निर्बंध असल्यामुळे अशा परिस्थिती विराट आपल्या तब्येतीची काळजी घेत आहे. त्याचा असाच एक व्हिडीओ नुकताच अनुष्काने इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्यात विराट मोजून-मापून जेवण जेवताना दिसत आहे. अनुष्काचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून सध्या प्रचंड चर्चेत आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment