गुगल आणत आहे ShareIt ला पर्याय


आपल्यापैकी अनेकजण ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी येण्यापूर्वी स्मार्टफोन्समध्ये मोठ्या साइजच्या फाइल्स शेअर करण्यासाठी ShareIt किंवा Xender या अ‍ॅप्सचा वापर करत होते. पण नुकतीच भारत सरकारने या चिनी अॅप्स बंदी आणल्यानंतर अशा फाइल्स ट्रांसफर करण्यासाठी त्यामुळे युजर्स सध्या दुसऱ्या अ‍ॅपच्या शोधात आहेत. आता गुगलकडून अशा युजर्सना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण सध्या एक नवीन फीचरची टेस्टिंग गुगल घेत असून याद्वारे मोठ्या साइजच्या फाइल्स काही सेकंदांमध्ये दुसऱ्या फोनमध्ये ट्रांसफर करता येणे शक्य होणार आहे.

Nearby Share हे फीचर लवकरच गुगल आणणार आहे. अ‍ॅपलच्या AirDrop फीचरप्रमाणे हे फीचर काम करते. अँड्राइड युजर्स याद्वारे एका डिव्हाइसमधून अन्य डिव्हाइसमध्ये फाइल्स पाठवू शकतील. या डिव्हाइसच्या बीटा टेस्टिंगला कंपनीकडून सुरूवात झाली असून हे फीचर काही बीटा व्हर्जन वापरणाऱ्या युजर्सना उपलब्ध करुन देण्यात आले आहे. हे नवीन फीचर Android 6 आणि त्यानंतरच्या पुढील सर्व अँड्रॉइड डिव्हाइसला सपोर्ट करेल.

अ‍ॅपलच्या AirDrop द्वारे युजर्स कॉन्टॅक्ट्स आणि फोटो कोणत्याही एक्स्ट्रा सेटअपशिवाय सेंड करु शकतात. त्याचप्रमाणे गुगलचं हे नवीन फीचर अँड्राइड ग्राहकांना पर्याय देईल. androidpolice च्या रिपोर्टनुसार, फोटो, व्हिडिओ आणि लिंक्सही या फीचरद्वारे शेअर करता येतील. हे फीचर ज्या युजर्सना वापरायचे असेल ते बीटा व्हर्जनमध्ये ते वापरुन बघू शकतात. यासाठी युजरला गुगल प्ले सर्व्हिसेसमध्ये बीटा टेस्टरसाठी साइन-अप करावे लागेल. युजर्सना क्विक अपडेटनंतर शेअर शीटमध्ये Nearby Share हा पर्याय दिसेल.

Leave a Comment