हे खरच सरकार नाही CIRCUS आहे; नितेश राणेंची टीका


मुंबई – भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबई पोलिसांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पोलीस उपआयुक्तांच्या बदल्या 48 तासांच्या आता स्थगित करण्याची सरकारवर नामुष्की ओढविली यावरुन ट्विटरच्या माध्यमातून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान, 2 जुलै रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील 10 पोलीस उपायुक्तांच्या मुंबई अंतर्गत बदल्या केल्या होत्या, पण तीन दिवसानंतरच या बदल्या मुख्यमंत्र्यांकडून रद्द करण्यात आल्या आहेत.


नितेश राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, नगरविकास मंत्रालयातील बदल्या नव्हे तर फेरफार (आघाडी सरकारच्या भाषेत ) मंत्र्यांच्या संमतीशिवाय?? DCP च्या बदल्या झाल्यावर गृहमंत्र्यांना कळते??मात्र कांग्रेसचे महसूल आणि PWD मंत्र्यांना बदल्या करण्यास मनाई?? हे खरच सरकार नाही CIRCUS आहे.

Leave a Comment