३१ जुलैला ओटीटीवर रिलीज होणार विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’


अभिनेत्री विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेल्या आणि ‘ह्युमन कॉम्प्युटर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतला देवींवर आधारित या चित्रपटाची रिलीज डेट विद्याने नुकतीच जाहिर केली आहे. यासंदर्भात विद्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर ३१ जुलैला रिलीज होणार आहे.


दरम्यान, विद्या याच चित्रपटाच्या टिझरमध्ये अगदी शकुंतला देवींसारखीच दिसत आहे. तर इंस्टाग्रामवर आता या चित्रपटाची रिलीज डेट हटके अंदाजात शेअर करण्यात आले आहे. शकुंतला देवी या लेखिका आणि मेंटल कॅल्क्‍युलेटर होत्या. त्या कॅल्क्‍युलेटर शिवाय कोणतेही गणित सहज सोडवायच्या, असे सांगितले जाते. त्यांच्या या अलौकिक क्षमतेमुळेच त्यांना ‘ह्युमन कॉम्प्युटर’ असे म्हटले जायचे. त्यांच्या या क्षमतेमुळे त्यांचे नाव गिनिज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्येही नोंदवले गेले होते.

या चित्रपटाचे दिग्दर्शन अनु मेनन करत असून विद्याने या चित्रपटासाठी मुद्दाम बॉय कट करून घेतला आहे. त्याचबरोबर विद्या गणिताची समिकरणे तोंडी सोडवण्याचाही तिने प्रयत्न केला. स्क्रीप्टमध्ये तिच्यासाठीच्या रोलनुसार शकुंतला देवी बनण्यासाठी दिसण्याबरोबरच गणिताची अधिक तोंडओळख करण्याचाही तिने खूप सराव केला.

Leave a Comment