महाराष्ट्र पोलिसांच्या क्रिएटीव्हीटीला सलाम; हटके पद्धतीने समाज प्रबोधन


गेल्या ३ महिन्यांपेक्षा जास्त काळ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. त्यात आता अनलॉकच्या माध्यमातून काही गोष्टींना सरकारने परवानगी दिली असली तरीही वाढती रुग्णसंख्या पाहता, पुन्हा सरकारने लॉकडाउन जाहीर केला आहे. या काळात पोलीस यंत्रणांवर विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर अंकुश ठेवण्याचे काम आहे. या काळात अनेक माध्यमांतून महाराष्ट्र पोलीस जनतेला घरात राहून सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरण्याबद्दल जनजागृती करत आहेत.


महाराष्ट्र पोलीस सोशल मीडियाच्या माध्यमातूनही कोरोनाविषयीची माहिती क्रिएटीव्ह पद्धतीने देत असतात. तर यावेळी महाराष्ट्र पोलिसांनी मराठी नाटकांच्या नावाचा वापर करुन ट्विटर हँडलवर लॉकडाउनचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन जनतेला केले आहे. आपल्या आवडत्या नाटकात कलाकारांना त्याच भूमिकेत पुन्हा एकदा बघण्यासाठी आधी आपल्याला जबाबदार नागरिकाची भूमिका निभवावी लागेल, असे म्हणत महाराष्ट्र पोलिसांनी जनतेला लॉकडाउनचे नियम पाळत पोलीसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment