वैज्ञानिकांनी टीका केल्यानंतर लसीबाबत ICMR चे घुमजाव


नवी दिल्ली : यंदाच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी कोरोना प्रतिबंधक लस बाजारात आणणार असल्याची घोषणा करत देशातील नागरिकांना दिलासा होता. त्याचबरोबर त्यासाठी त्यांनी थेट फास्ट ट्रॅक क्लिनिकल ट्रायल करण्याची तयारी केली होती. पण, रुग्णांच्या व लोकांच्या जीवाशी खेळ असल्याचाच हा प्रकार असल्याची टीका वैज्ञानिकांनी केली होती.

त्याचबरोबर १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी याचा राजकीय घोषणेसाठी वापर करण्याची ही तयारी असल्याची टीका काही राजकीय पक्षांनी केली. अखेर इंडियन कांऊसिल ऑफ मेडिकल रिसर्चला संशोधक व विरोधी पक्षाच्या या टीकेमुळे जाग आली असून त्यांनी आता शहाणपणाची भाषा करत तसा प्रयत्न असल्याचे म्हटल्यामुळे देशातील अधिकृत अशा ICMR आपले शब्द फिरवण्याची वेळ आली आहे.

Leave a Comment