देशभरातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात २४ हजार ८५० नव्या रुग्णांची वाढ


नवी दिल्ली – जगभरातील बहुतांश देश कोरोना या जीवघेण्या व्हायरसच्या विळख्यात अडकले असून आपल्या देशात देखील त्याचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच मागील चोवीस तासांत देशभरात २४ हजार ८५० नव्या कोरोनाबाधितांची आतापर्यंतची विक्रमी नोंद झाली आहे. तर या जीवघेण्या व्हायरसमुळे ६१३ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्ण संख्या वाढीतील हा आतापर्यंतचा उच्चांक मानला जात असल्यामुळे देशभरातील कोरोनाबाधितांचा आकडा संख्या ६ लाख ७३ हजार १६५ वर पोहचला आहे.

देशभरात सध्या तब्बल ६ लाख ७३ हजार १६५ कोरोनाबाधितांमध्ये उपचार सुरू असलेल्यांची संख्या २ लाख ४४ हजार ८१४, तर उपचारानंतर रुग्णालायतून ४ लाख ९ हजार ८३ जणांना सुट्टी देण्यात आली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे १९ हजार २६८ जणांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत देण्यात आलेली आहे. देशभरात ४ जुलैपर्यंत तब्बल ९७ लाख ८९ हजार ६६ नमूने तपासण्यात आले आहेत. यातील २ लाख ४८ हजार ९३४ नमुण्याची तपासणी झाल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.

Leave a Comment