संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चीनला झटका; अमेरिका, जर्मनीने घेतली भारताची बाजू


नवी दिल्ली – चीनला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बुधवारी मोठा झटका लागला असून अमेरिकेने चीनच्या एका प्रस्तावावर आक्षेप घेत अखेरच्या क्षणी ते थांबवले. कारण सोमवारी कराची स्टॉक एक्सचेंजवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत चीनने भारताविरूद्ध खेळी खेळण्याचा प्रयत्न केला होता. पण अमेरिका आणि जर्मनीने चीनच्या प्रस्तावावर आक्षेप घेतल्याने चीनला मोठा झटका बसला आहे.

अमेरिका हा चीनच्या या प्रस्तावावर आक्षेप घेणारा दुसरा देश होता. यापूर्वी हा प्रस्ताव प्रसिद्ध होण्याच्या काही मिनिटांपूर्वी मंगळवारी जर्मनीने यावर आक्षेप घेत तो थांबवला होता. दोन्ही देशांनी उचललेले हे पाऊल भारतासोबत संबंध अधिक दृढ असल्याचे प्रतीक मानले जात आहे. यापूर्वी कराची स्टॉक एक्सचेंजवर झालेल्या हल्ल्याचा जबाबदार भारत असल्याचा आरोप सोमवारी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला होता.

चीनने या हल्ल्यात ठार झालेल्यांसाठी शोक व्यक्त करताना पाकिस्तानशी असलेले दृढ संबंध व्यक्त करण्यासाठी एक प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव चीनने मंगळवारी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत सादर केला. यावर संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या नियमानुसार न्यूयॉर्कच्या स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ४ वाजेपर्यंत कोणत्याही सदस्याने आक्षेप घेतला नसता तर ते संमत झाल्याचे समजले गेले असते. यासाठी हा प्रस्ताव ‘सायलेंस प्रोसिजर’च्या रूपात सादर करण्यात आला.

पण मंगळवारी संध्याकाळी ४ च्या सुमारासच यावर जर्मनीने आक्षेप घेतला. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानातील हल्ल्यासाठी भारताला जबाबदार धरले आहे. पण स्वीकाहार्य नसल्याचे मत यूएनमधील जर्मनीच्या राजदूतांनी व्यक्त केले. दरम्यान, यावर चीननेदेखील आक्षेप घेत अंतिम मुदत संपल्याचे म्हटले होते. पण या प्रस्तावावरील अंतिम मुदत वाढवून १ जुलै सकाळी १० वाजेपर्यंत करण्यात आली होती.

Leave a Comment