बाबो! चक्क डोक्यावर बाईक घेऊन बसवर चढली व्यक्ती, व्हिडीओ व्हायरल - Majha Paper

बाबो! चक्क डोक्यावर बाईक घेऊन बसवर चढली व्यक्ती, व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर एक विचित्र व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल. कारण या व्हिडीओमध्ये व्यक्तीने जे केले आहे, ते सर्वांनाच जमेल असे नाही. एक व्यक्ती बाईकला डोक्यावर घेऊन बसवर चढताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्याचा हा स्टंट खूपच धोकादायक होता. त्याने यासाठी कोणत्याही प्रकारची मदत देखील घेतली नव्हती.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, चार लोक बाईकला उचलतात व एका व्यक्तीच्या डोक्यावर ठेवतात. यानंतर ती व्यक्ती झपझप बसवर चढते व त्यानंतर वरती असलेले लोक बाईकला उतरवतात. हा स्टंट कोणीही करू नये, कारण हे धोकादायक ठरू शकते.

हा व्हिडीओ कुठला आहे, याची अद्याप माहिती मिळालेली नसली तरी सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 9 हजारांपेक्षा अधिक जणांनी पाहिले असून, नेटकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Leave a Comment