हार्ले डेव्हिडसनवर फिरताना दिसले सरन्यायाधीश बोबडे, फोटो व्हायरल

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. शरद बोबडे यांना हार्ले डेव्हिडसन बाईकवर बसल्याचे पाहण्यात आले. बाईकसोबत काढलेले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

फोटोमध्ये सरन्यायाधीश बोबडे या शानदार बाईकवर बसलेले दिसत आहेत. तर आजुबाजूच्या लोकांना मास्क घातलेला आहे. मात्र बोबडे यांनी मास्क घातलेला नाही. सरन्यायाधीश बोबडे सध्या नागपूरमध्ये आपल्या घरी असून, तेथूनच महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी करत आहेत. रविवारी सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांचे लक्ष हार्ले डेव्हिडसन बाईकवर गेले. यावेळी बाईक चालवणाऱ्या सरन्यायाधीश बोबडे यांचे फोटो काढण्यात आले.

ही हार्ले डेव्हिडसन लिमिटेड एडिशनची CVO 2020 बाईक आहे. या फोटोमध्ये बोबडे यांच्या बाईकची आवड स्पष्ट दिसत आहे. सर्वसाधारणपणे सरन्यायाधीश अशाप्रकारे दिसत नाही, त्यामुळे नेटकरी देखील हे फोटो पाहून थोडेसे हैराण झाले. अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.

Leave a Comment