सरन्यायाधीशांच्या Harley स्वारीवर प्रशांत भूषण यांची टीका


नवी दिल्ली – सध्या सोशल मीडियावर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा एक फोटो चर्चेचा विषय बनत आहे. सरन्यायाधीश या फोटोमध्ये हार्ले डेव्हिडसन या सुपर बाइकवर बसलेले दिसत आहेत. त्यांचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत असून नेकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया त्यावर येत आहेत. पण, याच फोटोवरुन सरन्यायाधीश बोबडे यांच्यावर वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी टीका केली आहे.


लॉकडाउन मोडमध्ये सर्वोच्च न्यायालय ठेवून आणि नागरिकांना न्याय मिळण्याचा मूलभूत अधिकार नाकारुन सरन्यायाधीश नागपूरमध्ये ५० लाख रुपये किंमतीची भाजप नेत्याची मोटरसायकल चालवतात, तेही मास्क आणि हेल्मेट न घालता, अशी टीका वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी केली आहे. त्यांनी ही टीका सरन्यायाधीशांचा फोटो ट्विटरवर शेअर करुन केली आहे.

Leave a Comment