नरेंद्र मोदींबद्दल इम्रान खानने वापरले अपशब्द; म्हणाला वैफल्यग्रस्त


इस्लामाबाद – कोरोना व्हायरसशिवाय पाकिस्तानमध्ये छापून येणाऱ्या उर्दु वृत्तपत्रातील आणखी एका वृत्तामुळे खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या संसदेत पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वापरलेले अपशब्द चर्चेचा विषय बनला आहे. यासंदर्भातील वृत्त पाकिस्तानातील अखबार या वृत्तपत्राने छापले असून, त्यांनी आपल्या वृत्तात इम्रान खानने मोदींचा वैफल्यग्रस्त असा उल्लेख केल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरच्या मुद्दयावरुन गरळ ओकली असून नरेंद्र मोदींबद्दल इम्रान खानने अपशब्द वापरले आहेत. इम्रान खानने म्हटले की, भारत व्याप्त काश्मीरच्या समस्येला 5 ऑगस्टपूर्वीच जगभरात मांडण्यासाठी आम्ही आंदोलन उभारणार आहोत. खान यांनी हे वक्तव्य भारत-पाकिस्तानच्या सीमारेषेवरील लोकांसाठी कल्याणाकारी योजना असलेल्या ‘एहसास इमरजेंसी कैश प्रोग्राम’ च्या उद्घाटनावेळी केले आहे.


सीमारेषेवरील 1 लाख 38 हजारु कुटुंबांना या योजनेद्वारे रोख स्वरुपात आर्थिक मदत देण्यात आली. नरेंद्र मोदी भारताच्या अधिपत्याखालील काश्मीरमध्ये नरसंहार करत आहेत, जागतिक संघटनेने यासंदर्भात दखल घेतली पाहिजे, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर काश्मिरी लोकांच्या स्वातंत्र्यासाठी सुरु असलेल्या संघर्षाला ताकदीच्या जोरावर कुणीही दाबू शकत नसल्याचे खान यांनी म्हटले आहे. तर, मोदी आम आदमी नहीं हैं, वो दिमाग़ी मरीज़ हैं और भारत को तबाही की तरफ़ ले जा रहे हैं, असे शब्द इम्रान खानने वापरले आहेत.

दरम्यान, इम्रान खानच्या या भाषणाची सध्या पाकिस्तानमध्ये चांगलीच चर्चा होत आहे. पण, भारतीयांनी इम्रान यांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, ट्विटरवर इम्रान खानला चांगलेच सुनावले आहे.

Leave a Comment