सोशल मीडियात व्हायरल होत आहे सुशांतचा अखेरच्या चित्रपटाच्या सेटवरील व्हिडीओ


अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी १४ जून रोजी मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. बॉलिवूडसह सर्वांनाच सुशांतच्या त्याच्या आत्महत्येची घटना सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली.

दरम्यान सध्या सुशांतचे मृत्यूनंतर जुने व्हिडिओ सोशल मीडियात खूप व्हायरल होत आहेत. सुशांत प्रत्येक व्हिडिओत हसत खेळत किंवा गात आणि नाचत असल्याचे दिसत आहे. सध्या सुशांतचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, तो त्यामध्ये डान्सर सुब्बालक्ष्मी यांच्यासोबत डान्स करताना दिसत आहे.


सौभाग्य वेंकटेश यांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. सुशांत त्यामध्ये खूप आनंदी असल्याचे दिसत आहे. आपल्या खास अंदाजात डान्स करताना तो दिसत आहे. सुशांतच्या अखेरचा चित्रपट दिल बेचारा या चित्रपटाच्या सेटवरील हा व्हिडिओ असल्याचे म्हटले जात आहे. सुशांत प्रसिद्ध डान्सर सुब्बोलक्ष्मी यांच्यासोबत मजाक-मस्ती आणि डान्स करताना या व्हिडिओत दिसत आहे.

सुशांत सिंह राजपूतचा अखेरचा दिल बेचारा हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २४ जुलै रोजी हॉटस्टारवर रिलीज होणार असून हा चित्रपट सर्वांसाठी मोफत असणार आहे. मुकेश छाब्रा दिग्दर्शित ‘दिल बेचारा’ या चित्रपटात सुशांत मुख्य भूमिकेत आहे. तसेच अभिनेत्री संजना सांघी ही सुशांतसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. संजना या चित्रपटाच्या निमित्ताने कलाविश्वात पदार्पण करणार आहे. तसेच या चित्रपटात पाहूण्या कलाकाराच्या भूमिकेत अभिनेता सैफ अली खानदेखील दिसणार आहे. जुलै २०१८मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. तसेच हा चित्रपट जॉन ग्रीक यांच्या ‘द फॉल्ट इन आवर स्टार्स’ या पुस्तकावर आधारित असल्याचे म्हटले जाते.

Leave a Comment