अखेर इंदुरीकर महाराजांविरोधात ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल


संगमनेर – संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलाबाबत इंदुरीकर महराज यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. इंदुरीकर महारांज यांच्यावर संगमनेर न्यायालयात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वृत्ताला संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदुरीकर महाराजांविरोधात १९ जून रोजी संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल झाला आहे.

किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर प्रचंड प्रमाणात टीकेची झोड उडाली होती. त्यानंतर इंदुरीकर यांनी PCPNDT कायद्याच्या कलम २२ चे उल्लंघन केल्याचा आरोप भास्कर भवर यांनी केला आहे. त्यानुसार अहमदनगर येथील PCPNDT च्या सलागर समितीच्या सदस्यांनी त्यांना नोटीसही पाठवली होती. त्या नोटीसला इंदुरीकर महाराज यांनी आपल्या वकिलांमार्फत बाजू मांडत उत्तर दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या रंजना गावंदे यांनी नोटीस दिली हाती. त्यामध्ये प्रशासनाने गुन्हा दाखल न केल्यास तुम्हालाही दोषी धरण्यात येईल, असेही म्हटले होते. त्यानंतर इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Comment