सोनू निगमचा भूषण कुमारच्या पत्नीवर पलटवार


सिनेसृष्टीपेक्षा जास्त संगीतक्षेत्रात माफियाराज चालते, असा आरोप करत प्रसिद्ध गायक सोनू निगमने एकच खळबळ उडवून दिली होती, त्यानंतर सोनूने टी-सिरीजचे भूषण कुमार यांच्या नावाचा उल्लेख करत एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर सोनू निगम आणि भूषण कुमार यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आला आहे.

सोनू निगमने संगीत क्षेत्रातही घराणेशाही, मक्तेदारी चालते असे म्हणत थेट भूषण कुमारवर आरोप केल्यानंतर भूषण कुमारची पत्नी दिव्या खोसला कुमार हिने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात तिने सोनू निगम टी-सिरीजने केलेली मदत कशाप्रकारे विसरला हे तिने सांगितले. पण व्हिडीओ पोस्ट करताना तिने कमेंट्स बंद ठेवले. आता तिला प्रतिउत्तर देण्यासाठी सोनूने आपल्या अकाऊंटवर तिचा व्हिडीओ पोस्ट करत नेटकऱ्यांना त्यावर प्रतिक्रिया देण्याचा मार्ग मोकळा करुन दिला आहे.

View this post on Instagram

I think she forgot to open her comments. Let's help her in that.

A post shared by Sonu Nigam (@sonunigamofficial) on


सोनू निगमने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘सादर करीत आहोत दिव्या खोसला कुमार… कदाचित ती कमेंट बॉक्स उघडायला विसरली. कृपया तिची मदत करा, असे उपरोधिक कॅप्शन लिहित दिव्याचा व्हिडीओ पोस्ट केला. सोनूने हा व्हिडीओ पोस्ट करताच नेटकऱ्यांनी त्याखाली भरभरून प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. आपल्या ११ मिनिटांच्या व्हिडीओमध्ये दिव्याने टी-सिरीजने कशाप्रकारे बाहेरुन आलेल्यांना संधी दिली, गुलशन कुमार यांनी सोनूची कशी मदत केली होती आणि ही मदत सोनू विसरला याबद्दल बोलून दाखवले.

Leave a Comment