आता भारतीय व्यापाऱ्यांना कर्ज देणार गुगल

गुगलने आपले पेमेंट अ‍ॅप गुगल पे भारतात लाँच केल्यानंतर फायनेंशियल बाजारावर पकड मजबूत केली आहे. आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी गुगल आता भारतीय व्यापाऱ्यांना कर्ज देणार आहे. गुगलने या बाबतची माहिती देताना सांगितले की, गुगल पे च्या बिझनेस अ‍ॅपद्वारे भारतातील व्यापाऱ्यांना कर्ज देणार आहे. कोरोना व्हायरसमुळे नुकसान झालेल्या लघु उद्योगांना कर्ज देण्यासाठी वित्तीय संस्थांसोबत भागीदारी करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे.

गुगलने सांगितले की, कर्जाची सुविधा लवकरच गुल पेच्या बिझनेस अ‍ॅपमध्ये जारी केली जाईल. सध्या या अ‍ॅपचा वापर 30 लाखांपेक्षा अधिक भारतीय व्यापारी करत आहेत.  वर्ष 2018 मध्ये देखील गुगल पे च्या माध्यमातून कंपनीने प्री-एप्रूव्हड कर्जाची सुविधा दिली होती. यासाठी गुगलने भारतात फेडरल बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा सारख्या बँकेशी भागीदारी केली होती.

कर्जाशिवाय गुगलने आपल्या पेमेंट अ‍ॅपमध्ये नियरबाय स्टोर्स फीचर देशभरात जारी केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला हे फीचर केवळ चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, मुंबई आणि पुणे या शहरात लाँच करण्यात आले होते. नियरबाय स्टोर्स फीचरद्वारे दुकानदार दुकानातील स्टॉक, दुकान उघडे-बंद होण्याची वेळ आणि सोशल डिस्टेंसिंग सारखी माहिती सार्वजनिक करू शकतील. ही सर्व माहिती गुगल मॅप्समध्ये पिनद्वारे देखील दिसेल.

Leave a Comment