शहीद झालेल्या जवानाच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलणार सिद्धीविनायक मंदिर


मुंबई – महाराष्ट्रामधील सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील पानगाव येथील सीआरपीएफचे जवान सुनील काळे यांना जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा परिसरात दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले. दरम्यान, मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट त्यांच्या मुलाच्या पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणार आहे.

१८२ व्या बटालियन सीआरपीएफच्या हेड कॉन्स्टेबल सुनील काळे यांना जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे एका दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीदरम्यान हौतात्म्य आले होते. दरम्यान, श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणार असल्याची माहिती ट्रस्टकडून देण्यात आली.

लष्कर, सीआरपीएफ आणि स्थानिक पोलीस यांच्या २३ जून रोजी पहाटे संयुक्त मोहिमेत पुलवामा भागात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात असताना तेथील बंडजू येथे दहशतवाद्यांशी चकमक उडाली. यात सीआरपीएफ जवान सुनील काळे यांना वीरमरण आले. काळे हे सोलापूर जिल्ह्यातील पानगाव (ता. बार्शी) येथील मूळ राहणारे होते.

Leave a Comment