महागड्या इंटरनेटपासून होणार सुटका, लवकरच मोठा निर्णय घेणार सरकार

भारतात इतर देशांच्या तुलनेत खूपच स्वस्त इंटरनेट मिळते. मात्र तरीही तुम्हाला जर महागड्या इंटरनेटबद्दल तक्रार असल्यास चिंता करण्याची गरज नाही. केंद्र सरकार लवकरच फिक्स्ड लाईन ब्रॉडबँड सेवांसाठी लागू लायसन्स शुल्कात कपात करण्याचा विचार करत आहे. यानंतर ब्रॉडबँड इंटरनेट खूपच स्वस्त होईल. यामुळे घरगुती ब्रॉडबँड कंपन्यांना लायसन्स शुल्क द्यावे लागणार नाही व कंपन्या स्वस्त दरात इंटरनेट सेवा पुरवतील. ट्रायच्या आकडेवारीनुसार सध्या देशात फिक्स्ड लाईन ब्रॉडबँड वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या 1.98 कोटींपेक्षा अधिक आहे.

अमर उजालाच्या वृत्तानुसार, नवीन प्रस्तावामध्ये म्हटले आहे की ब्रॉडबँड कंपन्यांद्वारे स्थानिक स्तरावर होणाऱ्या कमाईवरील लायसन्स शुल्क कमी करून वर्षाला 1 रुपये करण्यात यावे. सध्या फिक्स्ड लाईन ब्रॉडबँड सर्व्हिसच्या परवानगी लायसन्स शुल्क 1 वर्षासाठी जवळपास 880 कोटी आहे. मात्र अद्याप या प्रस्तावाला कॅबिनेटकडून मंजूरी मिळाले नाही. या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यास सर्वाधिक फायदा जिओ फायबरला होईल. शुल्क कपात झाल्यास जिओला देशातील अन्य भागात देखील आपली सेवा पोहचवता येईल.

केवळा एका वर्षात जिओ फायबरच्या ग्राहकांची संख्या 8.4 लाख झाली आहे. बीएसएनएलच्या ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या 82.3 लाख आणि एअरटेलची ग्राहक संख्या 24.3 लाख आहे.

Leave a Comment