व्हिडीओ व्हायरल; जबरदस्ती शोमध्ये बोलवून आमच्या नावावर पैसे कमावतो करण जोहर


अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर घराणेशाही या वादाने आता खूपच जोर पकडला असून यामध्ये प्रामुख्याने उल्लेख होत असलेल्या निर्माता-दिग्दर्शक आणि स्टार किड्सला लाँच करणाऱ्या करण जोहर सध्या नेटकऱ्यांच्या रडारावर आहे. त्यातच काही नेटकऱ्यांनी कॉफी विथ करण या शोमधील काही व्हिडीओ शेअर करत त्याला चांगलेच झापले आहे. त्यातच आता सोशल मीडियावर अभिनेता रणबीर कपूरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. रणबीर या व्हिडीओत करणच्या शोबाबत नाराजी व्यक्त करत असल्याचे दिसत आहे.


रणबीरला ‘कॉफी विथ करण’ या शो विषयी प्रश्न AIB सोबत झालेल्या एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता. रणबीरने त्यावर दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता मला कंटाळा आला आहे. या सीझनमध्ये मी सहभागी होऊ शकत नाही, असे सांगितले होते. शोमध्ये मला जबरदस्ती बोलवण्यात आले होते. या विरोधात मी आणि अनुष्का बोलणार होतो आणि संपूर्ण इंडस्ट्रीला सोबत घेणार होतो. पण हे चुकीचे आहे. या शोच्या माध्यमातून करण जोहर आमच्या नावावर पैसे कमावतो, असे रणबीरने म्हटले आहे. हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. तसेच करण जोहरच्या कॉफी विथ करण शोचे सत्य, तो अनेकांना शोमध्ये येण्यासाठी जबरदस्ती करतो, असे हा व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे.

Leave a Comment