सुशांतचा ड्रीम प्रोजक्ट पूर्ण करणार मित्र


अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अचानक एक्झिटमुळे त्याचा जिवलग मित्र संदीप सिंह याला खूप मोठा धक्का बसला आहे. याचदरम्यान संदीपने सुशांतचा ‘वंदे भारतम’ हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचा खुलासा केला. सुशांतच्या अचानक एक्झिटमुळे त्याचे ड्रीम प्रोजेक्ट असलेला ‘वंदे भारतम’हा चित्रपट पूर्ण करण्याचा निर्धार संदीपने व्यक्त केला आहे. संदीप या चित्रपटातून सुशांतला श्रद्धांजली वाहण्यासाठी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकणार आहे.

View this post on Instagram

You made me a promise. We, the Bihari brothers, will one day rule this industry and be the inspiration/support system for all young dreamers like you and me bhai. You promised me that my directorial debut will be with you. Raaj Shaandilyaa wrote this and we were to produce this together. I need your belief, that faith you showed, that was my strength. Now, with you gone…I'm lost…but I promise you this my brother. Now tell me how do I fulfil this dream? Who will hold my hand like you did? Who will give me the power of SSR, my brother? I promise you this… I will make this film! And it will be a tribute to the loving memory of SSR who inspired millions and gave them hope that anything is possible! Just dream it and believe it! Those hours of discussions on this film we dreamed to make together…the film 'Vande Bharatam'…now all I am left with is your memories and this poster which was our dream starting to come true, this film my brother, will be the symbol of the undying light of your soul ❤️

A post shared by Sandip Ssingh (@officialsandipssingh) on


सोशल मीडियाच्या माध्यमातून संदीपने सुशांतच्या या ड्रीम प्रोजेक्टबद्दल सांगितले आहे. या चित्रपटाची निर्मिती सुशांत करणार असल्याचेही संदीपने सांगितले आहे. आपण या चित्रपटात काम करु असा शब्दही सुशांतने संदीपला दिला होता. तू मला आश्वासन दिले होते, आपण बिहारी भाऊ एक दिवस या इंडस्ट्रीवर राज्य करु आणि आपल्यासारख्या स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आदर्श ठरु तसेच त्यांना मदत करु, असे संदीपने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

संदीपने पुढे सांगितले की, माझ्या पहिल्या चित्रपटात काम करशील असा शब्द तू दिला होतास. आपण राज शांडिल्य यांनी लिहिलेल्या या चित्रपटाची एकत्र निर्मिती करणार होतो. माझ्यावर तू दाखवलेला विश्वास मला हवा आहे. ती माझी ताकद होती. आता तू नाही आहेस त्यामुळे मी रस्ता हरवलो आहे…पण हा चित्रपट मी तयार करणार असे तुला आश्वासन देतो. करोडो लोकांना प्रेरणा देऊन सर्व काही शक्य आहे असा विश्वास निर्माण करणाऱ्या सुशांतला ही श्रद्धांजली असेल असंही संदीपने म्हटले आहे. यावेळी संदीपने चित्रपटासाठी तयार करण्यात आलेले पोस्टरही शेअर केले आहे.

Leave a Comment