मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना संभाजी राजेंचे पत्र - Majha Paper

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना संभाजी राजेंचे पत्र


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खासदार संभाजी राजेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पत्र लिहिले आहे. या पत्राचा फोटो संभाजी राजेंनी त्यांच्या ट्विटवर अकाऊंटवरुन शेअर केला असून मराठा आरक्षणासंदर्भातील मराठी आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची एकही बैठक नवे सरकार आल्यापासून न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राचा फोटो शेअर करत संभाजी राजेंनी आरक्षणासंदर्भातील विषयावर एकजूट राखून निकराने लढण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून मुख्यमंत्र्यांपासून ते सर्वोच्च न्यायालयात लढा देत असलेल्या वकिलांपर्यंत सर्वांकडे मी स्वतः पाठपुरावा करत आहे. शेवटी अंतिम टप्यात आलेली अटीतटीची लढाई सर्वांनी एकजुट राखून निकराने लढण्याची आवश्यकता आहे. यात आपण स्वतः जातीने लक्ष घालाल असा विश्वास, असे संभाजी राजेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment