प्रसिद्धीसाठी राखी सावंतने ओलांडल्या सर्व मर्यादा, म्हणाली सुशांत माझ्या पोटी जन्माला येणार

सतत चर्चेत राहण्यासाठी राखी सांवत कोणतीही मर्यादा ओलांडू शकते हे सर्वांनाच माहिती आहे. आपल्या विचित्र वक्तव्यांमुळे राखी नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. आता पुन्हा एकदा तिने एक व्हिडीओ शेअर करत कोणालाही विश्वास बसणार नाही, अशी गोष्ट सांगितले आहे. राखीने 4 मिनिटांचा व्हिडीओ शेअर करत सुशांत सिंह राजपूत माझ्या स्वप्नात आला होता असा दावा केला आहे. राखी व्हिडीओमध्ये म्हणत आहे की, जेव्हा मी झोपेत होते, तेव्हा मला अचानक झटका बसला. मी विचारले कोण आहे ? तेव्हा मला आवाज आला मी सुशांत.

राखीने सांगितले की, सुशांत माझ्या स्वप्नात आला होता व पुन्हा येईल असे त्याने सांगितले आहे. यावर मी कसे असा प्रश्न विचारला असता, त्याने मी लग्न केल्यावर तुझ्या पोटी जन्म घेईल, असे सांगितले. राखीने व्हिडीओत सांगितले की, सुशांतची इच्छा आहे की त्याचे अर्धवट राहिलेले चित्रपट पुर्ण करावेत व त्यात मला आयटम नंबर द्यावे. याशिवाय राखीने कंगनाचे देखील आभार मानले.

राखीच्या या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर सुशांतच्या चाहत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एखाद्याच्या मृत्यूवर अशी मस्करी करणे चुकीचे असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment