कौतुकास्पद! चहा विक्रेत्याची मुलगी हवाई दलात झाली अधिकारी - Majha Paper

कौतुकास्पद! चहा विक्रेत्याची मुलगी हवाई दलात झाली अधिकारी

मध्य प्रदेशमधील एका छोट्याशी जिल्ह्यातील चहा विक्रेत्याच्या मुलीने सर्व संकटावर मात करत आपल्या वडिलांना अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. आंचल गंगवाल ही भारतीय हवाई दलात फ्लाईंग ऑफिसर झाली आहे. आंचल यांच्यासह 123 कॅडेटला हवाई दलात ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आले.

आंचलने सांगितले की, तिचे वडील सुरेश गंगवाल हे निमिच जिल्ह्यात चहाचे दुकान चालवत असे. आपल्या दोन मुली आणि एका मुलाला सर्व आवश्यक गोष्टी मिळाव्या यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. 23 वर्षीय आंचलने सांगितले की, तिने लहान असतानाच लष्करात दाखल व्हायचे असे ठरवले होते.

तिने सांगितले की, आज ऑफिसर झाल्यावर वेगळे वाटत आहे. स्वप्न सत्यात उतरले आहे. मला येथे पोहचवण्यासाठी ज्यांनी आयुष्यभर अनेक संकटांचा सामना केला, त्या आई-वडिलांसमोर गणवेशात उभे राहायचे, असे स्वप्न मी दररोज पाहत असे.  दरम्यान, लॉकडाऊनमुळे पासिंग आउट परेडला पालकांना उपस्थित राहण्यात आले नाही.  मात्र पालकांनी टिव्हीवर पासिंग आउड परेड पाहिले.

आंचल म्हणाली की, माझ्या पालकांनी कधीही माझ्या स्वप्नांवर शंका घेतली नाही किंवा मी मुलगी आहे म्हणून माझ्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले. मला सैन्यात जायचे आहे, असे सांगितल्यावर इतर पालकांप्रमाणेच त्यांना देखील काळजी वाटली. पण त्यांनी मला कधीही थांबवले नाही. त्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला. आंचलने मध्य प्रदेशमधील सिताराम जाजू गर्व्हमेंट गर्ल्स कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली आहे. हवाई दलात नियुक्त होण्याआधी ती मध्य प्रदेशच्या पोलिस विभागात सब-इन्स्पेक्टर आणि कामगार विभागात कामगार अधिकारी म्हणून देखील कार्यरत होती.

Leave a Comment