घराणेशाहीवरून आगपाखड करणाऱ्यांना सोनम कपूरचे उत्तर


बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या घराणेशाहीचा प्रश्न अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सोशल मीडियावरून करण जोहर, सलमान खान, आलिया भट्ट, सोनम कपूर यांच्यावर बरीच टीका होऊ लागली. बॉलीवूडमधील घराणेशाहीवर नामांकित कलाकारांनी भाष्य केले आणि बॉलिवूडमध्ये मक्तेदारी चालते, हे बोलून दाखवल्यानंतर आता ‘फादर्स डे’चे निमित्त साधत घराणेशाहीवरून टीका करणाऱ्यांना अभिनेत्री सोनम कपूरने सडेतोड उत्तर दिले आहे.


यासंदर्भात ट्विट करत सोनम म्हणाली, मला आज फादर्स डेनिमित्त आणखी एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे, होय… मी माझ्या बाबांची मुलगी आहे आणि ज्या ठिकाणी मी आज आहे ते माझ्या बाबांमुळेच आहे. होय, मला विशेषाधिकार आहे. हा अपमान नाही, माझ्या मला या सर्व गोष्टी मिळाव्यात यासाठी बाबांनी खूप मेहनत केली आहे आणि माझा जन्म कुठे व्हावा, कोणाच्या पोटी व्हावा हे माझे कर्म आहे. मला त्याचा अभिमान आहे.
नेटकऱ्यांनी सोनम कपूरच्या प्रत्येक पोस्टच्या कमेंट्समध्ये तिच्यावर भरभरून टीका केली आहे. तिने त्याचे स्क्रीनशॉटही शेअर केले होते. तिच्या सोबतच निर्माता-दिग्दर्शक करण जोहरवरही जोरदार टीका होऊ लागली आहे. त्यानंतर आलिया भट्ट, करण जोहर, सलमान खान या सेलिब्रिटींच्या फॉलोअर्सच्या संख्येत घट होऊ लागली आहे. काही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर या सेलिब्रिटींवर बंदी आणण्याची मोहीमच सुरु केली आहे.

Leave a Comment