दारुची होम डिलिव्हरी देण्यास अमॅझॉन, बिग बास्केटला परवानगी


कोलकाता – पश्चिम बंगाल सरकारने ऑनलाईन पद्धतीने दारुची होम डिलिव्हरी सेवा देण्यास अमॅझॉन व अलीबाबा या चायनीज कंपनीची भागीदारी असलेल्या बिग बास्केटला परवानगी दिली आहे.

यापूर्वीच झोमॅटो व स्वीगी या ऑनलाईन फूड – डिलिव्हरी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना सरकारतर्फे दारुची होम डिलिव्हरी करण्याची परवानगी देण्यात आली होती. सध्या कोलकाता व सिलिगुरी येथे झोमॅटो व स्वीगी दारुची होम डिलिव्हरी सेवा देत आहे.

सरकारी मालकीच्या पश्चिम बंगाल बीव्हीरेज कॉर्पोरेशन लिमिटेडने याबाबतचा निर्णय घेतला असून ना-हरकत प्रमाणपत्र अमॅझॉन व बिग बास्केटला देण्यात आले आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना बिग बास्केटचे प्रमुख हरी मेनन यांनी दारुची होम डिलिव्हरी कधी पासून सुरु होईल हे आताच सांगणे शक्य नसले तरी कंपनीचे हे ऑनलाईन दारुच्या विक्री क्षेत्रात टाकलेले पहिले पाऊल असल्याचे सांगितले.

दरम्यान, नागरिकांनी कोरोना संकटाच्या काळात दारु खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये यासाठी देशातील विविध राज्य सरकारतर्फे ऑनलाईन पद्धतीने दारु विक्री व घरपोच सेवा देण्यास परवानगी दिल्याचे पश्चिम बंगाल सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. पण याबाबत अद्याप कोणतीच प्रतिक्रिया देण्यास अमॅझॉनने नकार दिला.

Leave a Comment