आता व्हॉट्सअॅप वेब यजुरही करु शकणार व्हिडीओ आणि व्हॉइस कॉलिंग


नवी दिल्ली : तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या इस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप दरवेळेस आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर घेऊन येत असते. त्यातच व्हॉट्सअॅप ‘मल्टी डिवाइस लॉग इन’ पासून इतर फिचर्सवर देखील काम करत आहे. याचबरोबर आता व्हॉट्सअॅपला जास्त उपयोगी आणि संदुर करण्याची तयारी कंपनीने सुरु केली आहे. कंम्प्युटरमध्ये वापरण्यात येणाऱ्या ‘व्हॉट्सअॅप वेब’ साठी कंपनी नवीन फिचर घेऊन आली आहे. तसेच युजर्ससाठी काही नव्या थीमसुद्धा उपलब्ध करून देणार आहे.

जगभरात फेसबुकच्या मालकीचे व्हॉट्सअॅप आधीपासूनच लोकप्रिय आहे. व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी काही दिवसांपूर्वी ‘डार्क थीम’ लॉन्च केली होती. आता रंगांच्या आधारावर वेगवेगळ्या थीम तयार करण्यात येणार आहेत. सध्या त्यावर काम सुरु आहे. यासंदर्भात व्हॉट्सअॅपमध्ये नव्या अपडेट्सवर नजर ठेवणारी वेबसाइट WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, ग्रे, येलो आणि ग्रीन कलर थीमवर कंपनी काम करत आहे आणि डार्क थीमसोबतच या थीमही युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

कंपनीने व्हॉट्सअॅप वेबला अत्यंत उपयोगी बनवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. वेबमध्ये याचा वापर आतापर्यंत मेसेजिंगसाठी केला जात होता. यामध्ये कॉलिंगची सुविधा नव्हती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता वेबमध्येही कॉलिंगचे फिचर कंपनी उपलब्ध करून देणार आहे. यावर काम सुरु असून लवकरच व्हॉट्सअॅप वेबवरही ग्रुप व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर आपल्या युजर्ससाठी व्हॉट्सअॅप पेमेंट सर्विस देखील आणणार आहे. भारतात गेल्या दोन वर्षांपासून बीटा टेस्टिंग सुरु आहे. भारतात व्हॉट्सअॅप Pay अजुनपर्यंत पेमेंट मेथडमध्ये येणाऱ्या काही अडचणींमुळे अधिकृतपणे लॉन्च करण्यात आले नाही.

Leave a Comment