देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात पहिल्यांदाच धक्कादायक विक्रमी वाढ


मुंबई : देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात पहिल्यांदाच विक्रमी वाढ झाली असून मागील चोवीस तास देशभरातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात 14 हजारांपेक्षा जास्तची वाढ झाली आहे. तर काल दिवसभरात 375 लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्याचबरोबर 3 लाख 95 हजार 048 वर देशातील कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला आहे. त्यापैकी एकूण 2 लाख 13 हजार 831 रुग्णांनी कारोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 54.12 टक्के एवढा झाला आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 1 लाख 68 हजार 269 एवढे आहेत. मागील 24 तासात 9 हजार 120 रुग्ण बरे झाले आहेत तर 375 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण बळींची संख्या 12 हजार 948 एवढी झाली आहे.

त्याचबरोबर देशात कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट असलेल्या महाराष्ट्रात काल दिवसभरात 3827 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 50.49 टक्के एवढा आहे. राज्यातील 1935 रुग्णांना काल घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत कोरोनावर एकूण 62 हजार 773 रुग्णांनी यशस्वीपणे मात केली आहे. सध्या राज्यात 55 हजार 651 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सर्वात जास्त ज्यादा ॲक्टिव्ह केसेस महाराष्ट्रात आहेत. यानंतर दिल्ली, तमिलनाडू, गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ॲक्टिव्ह केसेस आहेत. ॲक्टिव्ह केसेसमध्ये भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे.

Leave a Comment