जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 87 लाखांच्या पार


नवी दिल्ली – संपूर्ण जगावर कोरोना या जीवघेण्या व्हायरसचे संकट ओढावलेले असून जगभरातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच आता जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा काल 87 लाखांच्या पार पोहचला आहे. यासंदर्भात वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, कोरोना व्हायरसची संपूर्ण जगभरात 87 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर चार लाख 61 हजारांवर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पोहोचली आहे. तसेच 46 लाख 20 हजारांहून अधिक लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जगभरात जवळपास 62 टक्के कोरोनाचे रुग्ण फक्त 8 देशांमध्ये आढळून आले आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 51 लाखांहून अधिक आहे.

अमेरिकेत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. 22 लाखांहून अधिक लोकांना अमेरिकेमध्ये आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर एक लाख 21 हजारांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. परंतु, आता दरदिवशी ब्राझीलमध्ये अमेरिकेहून अधिक रुग्ण आणि मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. अमेरिकेमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 33158 रुग्ण आढळून आले आहेत, तर 714 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ब्राझीलमध्ये 24 तासात 55,209 रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत एकूण 49,090 लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलनंतर रशिया आणि भारतात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे.

ब्राझील, रशिया, स्पेन, यूके, इटली, भारत, पेरूमध्ये कोरोना बाधितांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त आठ देश असे आहेत, जिथे एक लाखांहून अधिक कोरोना बाधित आहेत. चार देश (अमेरिका, ब्राझील, ब्रिटन, इटली) असे आहेत, जिथे 30 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा 1.21 लाखांहून अधिक झाला असून भारताचा समावेश कोरोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या टॉप-4 देशांमध्ये झाला आहे.

Leave a Comment