जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 85 लाखांहून अधिक


नवी दिल्ली – जगभरातील बहुतांश देशांमध्ये कोरोना या जीवघेण्या व्हायरसने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, जगभरातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस लाखोंच्या संख्येने वाढ होत आहे. या संदर्भात वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, कोरोनाची संपूर्ण जगभरात 85 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर जवळपास चार लाख 55 हजार लोकांचे आतापर्यंत कोरोनाने बळी घेतले आहेत. त्याचबरोबर 44 लाख लोक आतापर्यंत उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरात जवळपास 62 टक्के कोरोनाचे रुग्ण फक्त 8 देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 51 लाखांहून अधिक झाली आहे.

अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिकेतील 22 लाखांहून अधिक लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर तेथे एक लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पण आता अमेरिकेपेक्षा अधिक रुग्ण दरदिवशी ब्राझीलमध्ये आढळून येत आहेत. ब्राझीलनंतर रशिया आणि भारतात कोरोना बाधितांची संख्या जगभरात सर्वाधिक आहे.

ब्राझील, रशिया, स्पेन, इटली, भारत, पेरूमध्ये कोरोना बाधितांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त आठ देश असे आहेत, जिथे एक लाखांहून अधिक कोरोनाचे केस आहेत. चार देश (अमेरिका, ब्राजील, ब्रिटेन, इटली) असे आहेत, जिथे 30 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा 1.20 लाखांहून अधिक झाला आहे. भारताचा समावेश कोरोना बाधित टॉप-4 देशांमध्ये झाला आहे.

Leave a Comment