अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात बॉलीवुड अभिनेत्री रिया चक्रवतीने आपला जवाब नोंदवला आहे. तिची वांद्रे पोलिसांकडून तब्बल 11 तास चौकशी करण्यात आली. मागील काही दिवसांपासून रिया आणि सुशांत रिलेशनमध्ये असल्याच्या बातम्या समोर येत असल्यामुळेच सुशांतच्या आत्महत्येच्या मागील कारणांचा तपास करण्यासाठी रियाचा जबाब अत्यंत महत्त्वाचा समजला जात आहे.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या; पोलिसांकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीची 11 तास चौकशी
पोलिसांनी रियाकडे तब्बल अकरा तास चौकशी केली. त्याच बरोबर सुशांत सिंहच्या दोन माजी सेक्रेटरीचा ही जबाब नोंदविण्यात आला आहे. सकाळी अकराच्या दरम्यान पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या रियाला रात्री दहाच्या दरम्यान पोलिसांनी घरी सोडण्यात आले. सध्या सोशल मीडियात पोलीस स्टेशनमधून बाहेर पडतानाचे हे रियाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने ब्रांद्रा येथील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. परंतु, त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, पाटणामध्ये सुशांत सिंह राजपूतच्या अस्थी विसर्जन करण्यात आले. सुशांतच्या वडिलांनी त्याच्या अस्थिंचे विसर्जन केले.