पॉर्नस्टार रेनी ग्रेसीने दिली भारतीयांवर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी!


एकेकाळी प्रसिद्ध काररेसर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या 25 वर्षीय रेनी ग्रेसीने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत पॉर्नस्टार बनण्याचा निर्णय घेतला. आता कार रेसिंग आपले पॅशन राहिले नसल्याचे तिने म्हटले होते. पण, रेनी सध्या एका कारणामुळे भारतीय प्रेक्षकांवर नाराज असल्याचे दिसत आहे आणि तिने तिच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे ते दाखवून दिले.

आपली परवानगी न घेता भारतीयांनी तिचे फोटो वापरल्याचा आरोप ग्रेसीने केला आहे. तिने पॉर्न स्टार बनण्यासाठी सुपरकार रेसिंग कारकीर्द सोडल्यानंतर ती सध्या चर्चेचा विषय बनली आहे. पण सध्या तिने पॉर्न इंडस्ट्रीत बऱ्याच पैशांची बरीच कमाई केली आहे. आता दर आठवड्याला ग्रेसी 25,000 डॉलर्सची कमाई करते.

दरम्यान, तिच्या नावाने भारतीय यूजर्स अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट चालवत आहेत आणि तिचे फोटो चोरून वापरात असल्यामुळे ती संतापली आहे. ती याबाबत म्हणाली, भारतीय यूजर्स माझे फोटो वापरत आहे आणि ते कायदेशीर नाही. माझे फोटो चोरणे थांबवा, असे ग्रेसीने अडल्ट सदस्यता साइटवरील पोस्टमध्ये लिहिले. त्याचबरोबर तिने असेही म्हटले आहे की तिचे कंटेन्ट आणि कॉपीराइट आहे. तिने भारतीयांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली आहे.

ग्रेसीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, यापुढे भारतीयांचे स्वागत नाही. जेव्हापासून भारतात तिचे फोटो व्हायरल झाले तेव्हापासून या सर्व प्रकाराला सुरुवात झाली. माझी कहाणी जेव्हापासून भारतात भारतात व्हायरल झाली, तेव्हापासून असे बरेच व्हिडिओ आणि बनावट प्रोफाइल बनविले गेले आणि माझ्या OnlyFans कडून बेकायदेशीरपणे फोटो चोरी केले गेले आहेत.

दरम्यान, ग्रेसी डेली टेलिग्राफशी बोलताना म्हणाली, माझी आणि माझ्या कुटुंबाची आर्थिक स्थिती या निर्णयामुळे सुधारली आहे. एवढा पैसा मी स्वप्नातही पहिला नव्हता आणि आता ते माझ्यासाठी महत्वाचे आहे. यामुळे लोक काय म्हणतील याची मला पर्वा नाही. आता या माध्यमातून मी चांगला पैसा कमावत आहे आणि मी माझ्या निर्णयावर ठाम आहे, असल्याचे ती सांगते.

Leave a Comment